---Advertisement---
जळगाव : आदिवासी योजनेसाठी लाडक्या बहीण योजनेचा पैसा वळविण्यात आला असला तरी वेळेवर योजना राबवण्यासाठी कुठे पैसे वळवावा हा वित्तमंत्रांचा अधिकार असतो असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुढे म्हणले की, एखाद्या योजनेचा पैसा दुसरा योजनेसाठी वळवला याचा अर्थ ती योजना बंद होईल असा नाही. तात्पुरती व्यवस्था करण्याचा हा प्रयत्न आहे
ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचावर टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे मनातून बोलले की नाही हे महत्त्वाचे आहे. ते दिलसे पण बोलत नाही आणि मनसे पण बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे का ? असा प्रश्न विचारला असता, भाऊबंदकी म्हणून त्यांनी एकत्र यावं हे सर्वांना वाटतं. मात्र ते एकत्र येऊ नये यासाठी बरेच लोकं टपून बसलेले आहेत. मनसे दिल से भूमिका काही जरी असली तरी खालचे विचार करणारे लोक आहेत.
---Advertisement---

संजय राऊत यांनी भविष्यात दोन राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेना एकत्र येतील असा दावा केला आहे. याला उत्तर देतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हमाणे की, संजय राऊतानी कोणत्या ज्योतिषाला विचारला आहे हे त्यांना विचारावा लागेल असे खोचक उत्तर दिले. राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांना मैत्रीमंडळात घेण्यात आले आहे. त्यांना हे मंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या मुळेच मंत्रीपद मिळाले असल्याचा दावा केला. नेत्यांशिवाय मंत्रिपद मिळत नाही. मलाही त्यांच्यामुळेच मंत्रीपद मिळाले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक पालकमंत्री पदावरील वादाबाबत विचार मांडतांना सांगितले की, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मागच्यावेळी दावे प्रति दावे झालेली आहेत. पालकमंत्री पदाचा चेंडू हा वरच्या कोर्टात गेलेला आहे त्यामुळे नेते याबाबत ठरवतील.
गुलाबराव पाटील यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिंदे शिवसेना 100 जागा मिळतील असा दावा केला आहे. आमचा नेतृत्व जे दावे करतात त्या दाव्याच्या मागे आम्ही असतो. नेतृत्व जे मान्य करतील ते आम्ही मान्य करू. महायुतीच्या ताब्यात मुंबई महापालिका येणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.