Nana Patole : नाना पटोले यांचे मोठे व्यक्तव्य, पक्षाध्यक्षपदाबाबत वाचा काय म्हणले..

Nana Patole :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या दारूण पराभवामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पत्र आणि ईमेल लिहून मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे त्यांची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला होता. परिणामी पटोले हे प्रदेशाध्यक्ष पद सोडतील अशी चर्चा रंगत असताना नाना पटोले यांनी आपल्या राजीनाम्याबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे.

नाना पटोले यांनी महायुतीच्या विजयावर साशंकता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हे सरकार लोकांच्या मतांनी स्थापन झालेले नाही, आणि महाराष्ट्रातील जनता बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुकीची मागणी करत आहे. त्यांच्या मते, परभणी हिंसाचारामध्ये दलितांवर अत्याचार झाल्याचे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान करणाऱ्यांना अटक न करता त्या मागणी करणाऱ्यांना मारहाण केली गेली, हे सरकारच्या नकारात्मक वर्तनाचे उदाहरण आहे.

काँग्रेसच्या 101 जागांवर निवडणूक लढवून, फक्त 16 जागांवर विजय मिळवून काँग्रेसने ऐतिहासिक पराभवाचा सामना केला. यामध्ये नाना पटोले यांना भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात केवळ 208 मतांनी विजय मिळवता आला.

आता नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणताही राजीनामा दिला नाही, आणि पक्षाची प्रणाली अनुसार निर्णय हायकमांड घेईल असे स्पष्ट केले आहे. परभणी हिंसाचाराचा उल्लेख करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आणि त्यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांना अटक करण्याऐवजी ही मागणी करणाऱ्यांना लोखंडी सळ्यांनी मारहाण करण्यात आली. यात अनेकांना मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “महाराष्ट्रातील जनतेला राज्यात हुकूमशाहीचे सरकार हवे होते का? जनतेच्या भावनांचा आदर न करता जनतेवर आघात करणारे सरकार हवे होते का? याचाच अर्थ हे जनतेच्या मर्जीचे सरकार नाही. हे ईव्हीएम सरकार आहे आणि आम्ही याला विरोध करू आणि विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवू.