नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी; प्राधिकरणाला मिळणार स्वतःची इमारत..

---Advertisement---

 

Nashik Metropolitan Region Development Authority (एनएमआरडीए) च्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या सुमारे २३६.०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या वार्षिक बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राज्यमंत्री माधुरी मिसाल , आमदार किशोर दराडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एनएमआरडीएचे महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला.
या बैठकीत नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग) प्रकल्पालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. रिंगरोडच्या दोन्ही बाजूंना टप्प्याटप्प्याने ‘बाह्य वळण रस्ता प्रभाव क्षेत्र’ म्हणून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, एनएमआरडीएला स्वतःची कार्यालयीन इमारत खरेदी करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच भूखंड विल्हेवाट नियमावली, जाहिरात फलक धोरण, शासकीय जमिनींचे व्यवस्थापन आणि जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.


याशिवाय, शहरी नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन’ आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांना ज्ञान भागीदार म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
एकूणच, या निर्णयांमुळे नाशिक महानगर प्रदेशाच्या नियोजनबद्ध विकासाला मोठी चालना मिळणार असून भविष्यातील पायाभूत सुविधांसाठी मजबूत पाया तयार होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---