निसर्गाचा चमत्कार! आंब्याच्या झाडाला लागलं सीताफळ; पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

---Advertisement---

 

भिवंडीतील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. आंब्याच्या झाडाला सीताफळ कसं काय लागलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
देवाची करणी नारळात पाणी.. ही प्रचलित म्हण तुम्ही ऐकलीच असेल निसर्गाचा चमत्कार जेव्हा घडतो किंवा अशक्य अशी गोष्ट निसर्गात दिसून येते, तेव्हा ही म्हण चपलख बसते. असाच काहीसा चमत्कार भिवंडी तालुक्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावरील साईगाव अस्नोली या ठिकाणी दिसून आला आहे.
इथला व्यावसायिक शेतकरी जयेश पटेल यांच्या रस्त्यालगतच्या घराच्या अंगणात एक आठ वर्षांपूर्वी लावलेलं आंब्याचं झाड आहे. या झाडाला दरवर्षी भरभरून आंबे लागतात. परंतु 2 मे रोजी याच झाडाखाली खेळत असलेल्या मुलांना एक चमत्कार दिसून आला.

आंब्याच्या झाडावर आंबे तर लागलेच होते, परंतु त्याचसोबत त्याला एक सिताफळसुद्धा लागल्याचं दिसून आलं. ही चमत्कारिक गोष्ट पाहताच मुलांनी मोठया वडिलधाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर झाडाला लागलेलं सिताफळ पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. याची चर्चा सर्वदूर पसरल्याने पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---