पुन्हा एका भोंदू बाबाचे घाणेरडे चाळे आले समोर! नवऱ्यावर त्याचंच वीर्य वापरून केली काळी जादू? भूत काढण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार?

---Advertisement---

 

अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलेला फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘भूतबाधा काढतो’ आणि ‘काळी जादू दूर करतो’ असे सांगत एका भोंदू व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला तिच्या कुटुंबावर काळी जादू करण्यात आल्याचा दावा केला. विशेषतः तिच्या पतीवर काहीतरी अनिष्ट प्रयोग अर्थात तुझ्या नवऱ्यावर त्याचंच वीर्य वापरून काळीजादू केल्याचा दावा त्याने संबंधित महिलेसमोर केला असं सांगून तो पीडितेच्या संपर्कात आला. यामुळे घाबरलेल्या महिलेला त्याने विविध ठिकाणी बोलावून तथाकथित उपायांच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला सांगितले की, तिच्या आयुष्यातील अडचणी, पतीशी वाद आणि मुलीच्या आजारामागे भूतबाधा आणि काळी जादू कारणीभूत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून काही विशेष विधी करणे आवश्यक असल्याचे सांगत त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवले.

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत महाड, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात आरोपीने महिलेला वारंवार बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर अखेर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, महाराष्ट्रातील अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच इतर संबंधित कलमान्वये कारवाई सुरू आहे.

दरम्यान, सामाजिक संघटनांनी अशा भोंदू व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत असून, जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---