ऑनलाईन गेमिंगचे व्यसन ठरले जीवघेणे; तिन्ही सख्ख्या बहिणींची आत्महत्या

---Advertisement---

 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केल्यानंतर तिघींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. मृत मुलींचे वडील चेतन कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या मुली अनेक दिवसांपासून एका धोकादायक ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या.
तपासादरम्यान, आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे १४ वर्षांची प्राची ही त्या गेमची ‘लीडर’ असल्याचे समजले. तीच इतर दोन्ही बहिणींना गेमसंदर्भात सूचना देत होती. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यावर केवळ “Mummy Papa Sorry” असे लिहिलेले आढळले.
घटनेची माहिती मिळताच DCP निमिष पाटील आणि ACP अतुल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मुलींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. मुलींना गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अज्ञात ‘कंट्रोलर’ किंवा लिंकचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या घटनेमागे केवळ ऑनलाईन गेमिंगचा विरोध कारणीभूत आहे की इतर काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांच्या वाढत्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---