भडगाव : तालुक्यातील पळसखेडे ग्रामपंचायतीतील शौचालय घोटाळा उघड झाला आहे. यात ३१ लाख ८४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी विभागीय आयुक्तांनी तत्कालीन ग्रामसेवक जिभाऊ पाटील व भास्कर बागुल यांना दोषी ठरविले आहे. या दोघांना बडतर्फे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त गेडाम यांनी दिले आहेत. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल कारवाईची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याप्रकरणी बीडीओ रमेश वाघ यांनी प्रस्तावाची फाईली जाळल्या प्रकरणातील ११ आरोपी व दोन्ही बीडीओसह तर इतरांना सहआरोपी करण्याची मागणी विजय पाटील पाटील यांनी केली आहे.
पळसखेडे ग्रामपंचायतीतील शौचालय घोटाळ्याची सहा. बीडीओ यांनी चौकशी केली होती. यानंतर १४ वेळा फेर चौकशी व अहवालात फेरबदल करण्यात आला होता. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात ३ वेळा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यात बीडीओ रमेश वाघ यांनी दारूच्या नशेत संगनमताने शौचालय घोटाळाच्या प्रस्तावाची फाईल जाळली होती. यांनतर भडगाव पोलिस स्थानकात दप्तर व शौचालय फाईलीची चोरी झाली असा बनाव करून खोटी फिर्याद आरोपी व तत्कलीन बीडीओ दिपाली कोतवाल यांना गुन्हातून बाहेर काढण्यासाठी रवींद्र जगताप मार्फत खोटा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी दिपाली कोतवाल यांनी ३५ मयत लाभार्थी जिवंत दाखवून २०७ बोगस बीले काढली. बीडीओ रमेश वाघ यांनी प्रस्तावाची फाईली जाळल्या प्रकरणातील ११ आरोपी व दोन्ही बीडीओसह तर इतरांना सहआरोपी करण्याची मागणी विजय पाटील यांनी भडगाव पोलीस निरीक्षक व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे फेर तक्रार दाखल करण्यात आली आहे.