जळगाव : महानगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या भाडेवाढीच्या (. रेडिरेकनर दर ७ टक्के वाढवण्याचा निर्णय ) निर्णयांविरोधात फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात फुले मार्केट असोसिएशन, पहिला माळा असोसिएशन आणि सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन हे संयुक्तरीत्या उद्या शुक्रवारी (३० मे) दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
निषेध आंदोलनाचा कार्यक्रम
सर्व व्यापारी सकाळी १०:३० वाजता शहर पोलीस स्टेशन समोरील नूतन ड्रायफ्रुट्सजवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांसह एकत्र येणार आहेत. तेथून चार-चार व्यापाऱ्यांची शांत रांग करून कोणताही आवाज न करता एकत्रितपणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यातील. यानंतर महापालिकेत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे.
काळे कपडे घालून निषेध
या निषेधाचा भाग म्हणून सर्व व्यापाऱ्यांना काळे कपडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा निषेध आमच्या स्वहितासाठी असून भविष्यातील समस्या टाळण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्यापारी एकतेचा निर्धार
सर्व संघटना एकत्र राहिल्या तर पुढचा प्रत्येक मार्ग सोपा होईल, असे आवाहन करत व्यापारी संघटनांनी एकतेचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले आहे.
