भर चौकातून उचललं….लिंग कापण्याची धमकी आणि अमानुष अत्याचार…व्याजाच्या विळख्याने गाठला क्रूरतेचा कळस; काय घडलं?

---Advertisement---

 

उल्हासनगर शहरात व्याजाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका ३० वर्षीय तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणाहून अपहरण, बेदम मारहाण आणि नग्न करून छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार चिराग मीरचंदानी हे ९ फेब्रुवारी रोजी रात्री कॅम्प क्रमांक ५ परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवत असताना काही जणांनी अचानक हल्ला केला. लोखंडी पाईपने मारहाण करत त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अपहरणानंतर संबंधित तरुणाला आधी उल्हासनगर परिसरात आणि नंतर बदलापूर येथील एका कार्यालयात नेऊन मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

यानंतर आरोपींनी त्यांना माथेरान येथील एका लॉजमध्ये नेले. तिथे खोलीत कोंडून नग्न अवस्थेत मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित तरुण मानसिकदृष्ट्या हादरला आहे.

या प्रकरणामागे कर्ज आणि वाढीव व्याजाचा वाद असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, आरोपी सावकाराकडून ४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यापैकी मोठी रक्कम परत केल्यानंतरही अधिक पैशांची मागणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर १२ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

उल्हासनगर शहरात वाढणाऱ्या बेकायदेशीर सावकारी आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सावकारीविरोधी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---