बहुळा नदीकाठावर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ५६ हजाराच्या मुद्देमालासह ६ जण ताब्यात….!

---Advertisement---

 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बहुळा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी अचानक धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर मी माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे बहुळा नदी काठावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार पो.हे.कॉ. अरुण राजपूत, पो.कॉ. भारत पाटील व पो.कों. योगेश भिलखेडे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने घटनास्थळी जाऊन अचानक छापा टाकला असता सहा जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळ अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिंपळगाव (हरेश्वर)पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या कारवाई ने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---