अंबाऋषी टेकडीवर पोलिसांची धाड; चार प्रेमी युगुल रंगेहात पकडले, अमळनेरमध्ये दामिनी पथकाची कारवाई….!

---Advertisement---

 

अमळनेर शहराजवळील अंबाऋषी टेकडी परिसरात दामिनी पथकाने कारवाई करत चार प्रेमी युगुलांना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. दाट झाडीमध्ये प्रेम चाळे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेर असलेल्या अंबाऋषी टेकडी परिसरात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेजवळ मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून तेथे ऑक्सिजन पार्क तयार झाले आहे. मात्र या दाट झाडीचा गैरफायदा घेत काही प्रेमी युगुल दुपारच्या वेळेत त्या ठिकाणी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर दत्तात्रय निकम आणि नम्रता जरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दामिनी पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, नम्रता जरे, उज्वलकुमार म्हस्के आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने टेकडीवर अचानक धाड टाकली.

दामिनी पथकाने चारही बाजूंनी घेराव घालत चार तरुणी आणि चार तरुणांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले. चौकशीत संबंधित तरुण-तरुणींचे मूळ गाव वडजाई, बिलाडी, वसंतनगर, सांगवी तांडा, मोरफड मंगरूळ आणि पारोळा असल्याचे समोर आले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना समज देत त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपवले. तसेच अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्जन स्थळी अशा प्रकारे प्रेम चाळे करणाऱ्यांवर दामिनी पथकाची करडी नजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---