---Advertisement---
जळगाव : गो मांसाची तस्करी करण्याचे प्रकार उघड होत आहे. असाच प्रकार चोपडा शहरात उघड झाला आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेने कर्नाटक येथील कानपूरला जाणाऱ्या ट्रकमधून जवळपास २० लाखांचे मास व ७ लाखांचे चामडे असा एकूण २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकासह मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच चालकाला अटक करण्यात आली आहे..
चोपडा शहरातील शिरपुर बायपास रोडवर दुर्गेश पेट्रोल पंपासमोर (क्रमांक आर.जे-११-जी.बी- १०७१ ) या क्रमांकाची ट्रक उभी होती. या ट्रकमधुन उग्र वास येत असल्याचे नागरिकांच्या जाणवले त्यांनी पोलिसांना तात्काळ याबाबतची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन याबाबत ट्रक चालकाकडे विचारणा केली असता त्याने गाडीत चामडे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये गो वंशाचे मास व चामडे आढळून आले. या प्रकरणी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक मोनू कुमार हरिसिंग जाट (वय २३) रा. गढ़ी जोहरी पचोखरा ता. दुडला जि. फिरोजाबाद उत्तरप्रदेश याला अटक केली आहे. यावेळी ट्रक चालकाने हे मास बीजापुर कनार्टक येथून कानपुर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. सायली गोसावी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मालट्रकमध्ये मिळुन आलेले जनावरांचे कातडी, चामड्याची पहाणी करून सदरचे कातडे हे गोवंश जातीचे गाय, बैल, वळु याचे असल्याचे सांगुन फॉरेन्सिक तपासणी कामी त्यातुन नमुने घेवुन पॅक करुन पोलीसांचे ताब्यात दिले.
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकमध्ये ३४ हजार ७९० कि.ग्रॅ. वजनाचे मास होते. २७ लाख रुपये किमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक चालक व मालक यांचे विरुध्द पो. हे. कॉ. हर्षल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि. एकनाथ भिसे करीत आहेत.