बापरे ! जळगावात होत होती गोमांसाची विक्री, पोलिसांनी हस्तक्षेप करताच महिलांनी घातला गोंधळ

---Advertisement---

 

जळगाव : शहरात महापालकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याची घटना ताजी असताना इस्मामपूरा भागात अवैधपणे गोमांसची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही विक्री थांबिण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस निरीक्षकाला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील इस्लामपूर भागात अवैधपणे गोमांसची विक्री सोमवारी (९ जून) रोजी केली जात होती. याची गुप्त माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर यांना मिळाली. यानंतर त्या आपल्या पथकासह इस्लामपूरा भागातील मदिना मशिदकडे रवाना झाल्या. पोलीस पथक गोमांस विक्रेत्यांवर कारवाई करत असताना महिलांनी अरेरावीची भाषा वापरल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच नरगिस रऊफ खान (वय २०), जमीलाबी अजिज शेख (वय ७० दोन्ही रा. इस्लामपूरा, जळगाव) या महिलांनी मोठं मोठ्याने बोलत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत अरेरावीची केली. या महिलांनी पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर यांच्या अंगावर धावून जात हात उगारून धक्काबुक्कीसह शिवीगाळ देखील केली.

---Advertisement---

 

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्की इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरगिस रऊफ खान वय २०, जमीलाबी अजिज शेख वय ७० आणि मुस्तकीन शेख अजीज तीघे रा. इस्लामपूरा, जळगाव यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात अवैधरित्या गोमांस बाळगणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---