जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने शहरातशनिवारी (31 मे ) रोजी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सकाळी जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ,मल्हार सेना, कर्मचारी संघटना अहिल्या महिला संघ व सांस्कृतिक महासंघाच्या वतीने 300 महिलांची भव्य रॅली काढण्यात आली. पिवळे फेटे घातलेल्या महिला ह्या रॅलीचे आकर्षण ठरल्या.
रॅलीची सुरुवात माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फुलांनी सजवलेल्या रथातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर जीएस ग्राउंड येथून मोटर सायकल रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी रथाचे सारथ्य जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी केले.

रॅली ही जीएस ग्राउंड येथून स्टेट बँक नवीन बस स्थानक मार्गे आकाशवाणी चौक, शिव कॉलनी मार्गे खोटे नगर, तालुका पोलीस स्टेशन चंदू अण्णा चौकाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मल्हार सेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, अरुण ठाकरे, रमेश सुलताने, मंजुषा सूर्यवंशी, प्रमिला कंखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास माल्यर्पण पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरविंद देशमुख हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धर्मरक्षणाचे कार्य, विचार लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांनी पुढे सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली म्हणून त्या लोकाभिमुख राज्यकर्त्या ठरल्यात असे सांगितले.तुळशीराम सोनवणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश झोत टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बागुल, सूत्रसंचालन स्वाती पांढरे, आभार धर्मा सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास मंजुषा तेले, संगीता ठाकरे, स्वाती, लीला चऱ्हाटे, स्वाती कावडकर, ज्योती मोरे, संगीता गांधिले, जानवी कंखरे, संगीता कंखरे, प्रमिला धनगर, मृणाली कंखरे, भार्गवी धनगर, प्रमिला धनगर, तेजस्वी धनगर, प्रतीक्षा वैदकर, हर्षा धनगर, शोभा मोते, उषा सोनवणे, जयश्री वेतकर, मंदाकिनी पाचपोळ, सविता सोनवणे, वैशाली सोनवणे, मनीषा बाविस्कर, सुवर्णा सावळे, संध्या बाविस्कर, संगीता पाचपोळ, सुचीता बाविस्कर, वर्षा सोनवणे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संजय पाटील, महेंद्र सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे , कुणाल सुलताने, ऍडव्होकेट रिशी सोनवणे, डिगंबर सोनवणे, प्रवीण पवार, मयूर ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.