---Advertisement---

मनोहर भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा रयत सेनेतर्फे निषेध; भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

by team

---Advertisement---

चाळीसगाव : मागील काही दिवसांपासून मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडेंनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्या संदर्भांत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. याच धर्तीवर चाळीसगावात रयत सेनेतर्फे मनोहर भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

दुर्गराज रायगडावर दरवर्षी ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या सोहळ्यावर टीका करत तो बंद करण्याचे वक्तव्य मनोहर भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा रयत सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनामार्फत भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

निवेदन देतांना रयत सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी भिडेंच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. निवेदनात म्हटले आहे की, मनोहर भिडे यांनी राज्याभिषेक दिनाच्या तिथीवरून वाद निर्माण करत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या वकृत्वातून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो आहे. सरकारने यावर कठोर पावले उचलावी. शिवराज्याभिषेक सोहळा हा शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय असून तो चिरंतन सुरू राहणार असल्याचा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment