गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नशिराबादमध्ये आरएसएसचे पथसंचलन शांततेत संपन्न…!

---Advertisement---

 

नशिराबाद येथे गुढीपाडवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झिपरू अण्णा नगर तालुका तर्फे गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनाचे नेतृत्व श्री. मुकेश रविंद्र सोनवणे (रा. भादली बु., ता. जि. जळगाव) यांनी केले.

नशिराबाद शहरातील चौबे ग्राउंड येथून प्रारंभ झालेल्या या पथसंचलनाने ग्रामपंचायत चौक, शिवाजी महाराज चौक, जुनी युनियन बँक परिसर, सावता महाराज मंदिर खालची आळी, बसस्थानक, पोलीस स्टेशन, रामपेठ चौक, साती बाजार, उंचआड, होळी मैदान मार्गे आठवडे बाजार, कुंभार दरवाजा व इंदिरा चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा चौबे ग्राउंड येथे सकाळी ९.१५ वाजता शांततेत समारोप झाला.

या पथसंचलनात सुमारे १२५ ते १५० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. पथसंचलनामुळे नशिराबाद शहरात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे उपस्थित होत्या. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---