रुपाली चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार? रुपाली ठोंबरेंनी केला सनसनाटी आरोप; राज्यभरात खळबळ…!

---Advertisement---

 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आता नवीन वळण आलं असून, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आधीच लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे आरोप असून, त्याचे काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या राज्यातील मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला की, अशोक खरात याने जे काही कृत्य केले, त्यामागे चाकणकर यांचा पाठिंबा होता. त्यामुळे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या आरोपांनुसार, खरात याच्या गैरकृत्यांची माहिती आधीपासूनच काहींना होती, मात्र त्यावर कारवाई न होता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. तसेच, एका पत्रकाराला धमकावून माफीनामा घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांवर दबाव टाकून खरातला वाचवण्याचा प्रयत्न झाला, असाही गंभीर दावा करण्यात आला आहे. या सर्व आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं असून, राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकरणातील सत्य काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---