---Advertisement---

मुक्ताईनगर येथे संत भीमा भोई जयंती उत्सवातनिमित्ताने अभिवादन

by team

---Advertisement---

मुक्ताईनगर :    राष्ट्रीय संत श्री भीमा भोई यांची जयंती उत्साहात मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहावर साजरी करण्यात आली.    याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोई समाजाचे तालुका अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हा  उपप्रमुख छोटू भोई हे होते. यावेळी विनायक वाडेकर, सुभाष भोई, जितेंद्र भोई, गणेश भोई, पवन भोई,  रितेश भोई, शुभम भोई, आकाश भोई, मयूर भोई ,मनोज भोई, सोमा भोई, शुभम भोई, आर. के. ढोले हे उपस्थित होते.

भोई सेवा प्रतिष्ठानतर्फे देखील संत भिमाभाई यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवाधिकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मोहन मेढे हे होते. कार्यक्रमाला भीमा भोई प्रतिष्ठान प्रत्यक्ष व मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेव कर, मानव अधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर जंजाळकर, कार्याध्यक्ष बी. डी. गवई, रामदास मिस्त्री, विजय खराटे, आर. जी. लोखंडे, नर्मदा भोई, इंद्रायणी भोई हे उपस्थित होते.

चांगदेव येथे भव्य मिरवणूक

संत भीमा भोई जयंती निमित्त तालुक्यातील चांगदेव येथे देखील भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी संत भीमा भोई यांची पालखी व रथ देखील सजवण्यात आलेला होता. संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन व संत भीमा भोई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती तालुका भोई समाजाचे अध्यक्ष छोटू भोई, विनायक वाडेकर , माजी सरपंच पंकज कोळी, सुभाष भोई, समाधान भोई, तापीबाई भोई यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अक्षय भोई, आकाश भोई, सुमित भोई,  प्रविण भोई, न्यानश्वर भोई , योगेश म्हैसरे, दिनेश भोई, गणेश भोई,  भूषण भोई , कुणाल भोई, सागर भोई  , भोला भोई, मनोज भोई,  ईश्वर भोई, प्रशांत कोळी, रितेश कोळी, कुणाल कोळी  रोहण कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने भोई समाज बांधव व भगिनी मिरवणुकी सहभागी झालेले होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment