राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा या जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?

---Advertisement---

 

राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) १४ एप्रिलपासून राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला असून कोकण किनारपट्टीवर दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.


विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले असून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. १५ एप्रिलनंतर या भागात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान ३८ ते ४२ अंशांदरम्यान असून १६ एप्रिलपासून ते ४३ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर येथे कोरड्या हवामानामुळे उष्णतेचा तडाखा वाढला आहे. जळगावात सोमवारी ४२.१ अंश तापमानाची नोंद झाली असून हा या हंगामातील उच्चांक ठरला आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा येथे लख्ख सूर्यप्रकाशामुळे उष्णतेची तीव्रता वाढली आहे. विशेषतः सांगली आणि सोलापूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईसह कोकण पट्ट्यात तापमानापेक्षा दमटपणा अधिक असल्याने उकाडा वाढला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना घाम, थकवा आणि अस्वस्थतेचा त्रास होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---