---Advertisement---
गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्री प्रकरणात अडकलेल्या एका डॉक्टरने स्वतःवर प्राणघातक हल्ला करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरचे नाव सागर सिक्का असल्याची माहिती आहे. बाळाच्या विक्रीप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, या डॉक्टरने ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या पोटावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १० दिवसांच्या बाळाच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्यात ६ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा जिल्हा बाल विकास विभागाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्यात डॉ. नितेश वाजपेयी हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तक्रार दाखल झाल्यापासून तो आणि त्याचे तीन साथीदार पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
संध्याकाळच्या सुमारास संबंधित डॉक्टर बालाघाट-कटनी परिसरातून स्वतःच्या खासगी चारचाकी वाहनाने भंडाऱ्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, गोबरवाही परिसरात रस्त्याच्या कडेला लघुशंकेच्या बहाण्याने वाहन थांबवून त्याने अचानक ब्लेड काढून स्वतःच्या पोटावर वार केले. ही बाब लक्षात येताच चालकाने तातडीने डॉक्टरला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. सध्या या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ६ वर पोहोचली आहे. लल्लेश्वरी सादेपाच
सागर सिक्का (रा. गोंदिया) असे अटक करण्यात आलेले आरोपींची नवे आहे. डॉ. नितेश वाजपेयी, मालती प्रकाश वाघमारे, पोर्णिमा सतीश धुर्वे, उमेशसिंग रामचंद्र सिंग गहलोत (रा. गोंदिया) हे आरोपी अद्याप फरार आहेत.
नवजात बाळाच्या विक्रीसारख्या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. या टोळीत आणखी किती मोठे मासे अडकणार, आणि या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, हे येत्या तपासातून स्पष्ट होणार आहे









