---Advertisement---
मुंबई शहरातून नात्याला काळीमा फासणारी घटना ही समोर आली आहे. स्वतःच्या पोटच्या वीस वर्षीय मूकबधिर मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही तपासात समोर आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई शहरातील कफ परेड भागात एक 20 वर्षीय मूकबधिर तरुणी ही वास्तव्यास आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये संबंधित मुलीने तिच्या आजीकडे तिचं पोट दुखत असल्याची तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सदर मुलीच्या पोटात विचित्र हालचाली होत असल्याचं तिने तिच्या आजीला सांगितलं आणि तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि या तपासणी सदर मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आलं.
रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलीचा गर्भपात हा झालेला होता. त्यानंतर तिच्या गर्भातील डीएनए हे चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि 27 जानेवारी रोजी या सर्व तपासण्यांचा फॉरेन्सिक अहवाल हा प्रसिद्ध करण्यात आला यामुळे वडिलांचे डीएनए आणि गर्भातून निघालेला नमुना हा जुळत असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांनी सदर पीडित मुलीच्या वडिलांना 3 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. पीडित मुलीवर हा अत्याचाराचा प्रकार गेल्यावर्षी मार्च ते सप्टेंबर 2025 दरम्यान झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
22 सप्टेंबर 2025 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बापाचा या एफआयआर दाखल करण्यास स्पष्ट नकार असल्याचा समोर आलं. पोलिसांकडून तपासणी करत असताना मुलगी ही मूकबधिर असल्याने तिच्या बोलण्या आणि ऐकण्याच्या क्षमतेत बिघाड असल्याने तिचा जबाब नोंदवण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांची चौकशी केली परंतु त्यांनी कोणत्याही लैंगिक शोषणाला नकार दिला तथापि पीडित मुलीच्या वडिलांना त्याच्या मुलीच्या गरोदरपणाबद्दल स्पष्टीकरण देता आलं नाही त्यांनी एफ आय आर दाखल करण्यासही नकार दिला आणि समुपदेशन नंतर मुलीने तक्रार दाखल केली पण ती तिच्या वडिलांचं आणि इतर कोणत्याही आरोपीचं नाव सांगू शकली नाही.
त्यानंतर पोलिसांनी तिला अनेकांचे फोटो दाखवले मात्र तिच्या दिसण्यावरून एका सोळा वर्षीय मुलाला आणि एका 32 वर्षीय पुरुषाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली या तपासादरम्यान एकूण 17 संस्थेची डीएनए आणि रक्ताचे नमुने हे घेण्यात आलेले होते. यामध्ये पीडित मुलीचे वडील, कुटुंबातील सदस्य आणि पीडितेला वारंवार भेटणारे शेजारी यांचा देखील त्यात समावेश होता. तपासणी केल्यानंतर डीएनए अहवाल हा समोर आला आणि यात कोणाची भूमिका होती याचा पुढील तपास हा पोलिसांकडून आता करण्यात येत आहे.









