---Advertisement---
जळगाव : दुकानाची खिडकी फोडुन दारुच्या बाटल्या तसेच रोकड असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राष्ट्रीय महामार्गलगत आकाशवाणी चौक ते ईच्छादेववी चौक जवळ अशोका लिकर गॅलरी याठिकाणी घडली. बुधवारी २ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
दीपक बाळकृष्ण भंगाळे (वय ३८, रा. हनुमाननगर भुसावळ) हे व्यावसायिक असून त्यांचे वाईन शॉप आहे. नेहमीप्रमाणे ते बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर
असा नेला मुद्देमाल
---Advertisement---
१२८० रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या, ४० हजार रुपये रोख असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देम ाल चोरुन नेला.
दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेऊन तपासाला गती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे तपास करीत आहेत.
शिरसोली बाजारातून महिलेची मंगलपोत लंपास
जळगाव : आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरुन नेली. बुधवारी (२ जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना तालुक्यातील शिरसोली येथे सेंट्रल बँकेच्या गल्लीतील आठवडे बाजारात गिरधर हॉटेलसमोर घडली.
सरुबाई बापुराव गवंदे (वय ५२, रा. दापोरा, ता.जळगाव) या गृहिणी बाजारानिमित्त आल्या होत्या. बाजारातून जात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे चाळीस हजार किमतीची पोत लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने शोध घेतला असता पोत मिळाली नाही. याप्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक राहुल तायडे यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. हवालदार राम कृष्ण पाटील हे तपास करीत आहेत.