---Advertisement---

स्मिता वाघ यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर

---Advertisement---

नवी दिल्ली : देशातील खासदारांना त्यांनी संसदेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर केला जातो. यंदा १७ खासदारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार स्मिता वाघ यांचा देखील समावेश आहे.

‘संसदरत्न पुरस्कार 2025’ महाराष्ट्रातील ७ खासदारांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे , शिवसेना – शिंदे गटाचे श्रीरंग बारणे, शिवसेना – उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत , शिवसेना – शिंदे गटाचे नरेश म्हस्के, भाजपच्या स्मिता वाघ , भाजपच्या मेधा कुलकर्णी आणि कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड या खासदारांचा समावेश आहे. या सर्वांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दरवर्षी ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. यात संसदेत प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक कामात योगदान आणि समित्यांमधील कार्य या निकषांचा समावेश आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीद्वारे या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. यावर्षी दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी ४ खासदारांना विशेष संसदरत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात येईल.
भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे चार खासदार १६ वी आणि १७ वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरले आहेत. सध्याच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेने कार्य करीत असल्याचे कार्यरत प्राइम पॉइंट फाउंडेशनने कळविले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment