मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर बेलगाम ते महू, वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही विशेष रेल्वेगाड्यांचा भुसावळ विभागातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०७३२७ बेलगाम ते महू साप्ताहिक विशेष रेल्वेच्या १२ फेया होतील. ६ एप्रिल ते ११ मे दरम्यान दर रविवारी बेलगाम येथून ११.३० वाजता सुटेल आणि महू येथे मंगळवारी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३२८ विशेष ट्रेन ९ ते १४ मे दरम्यान दर बुधवारी महू येथून रात्री १० वाजता सुटेल आणि बेलगाम येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पोहचेल. या गाडीला भुसावळ विभागात येताना व जाताना मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा येथे थांबे असतील.
गाडी क्रमांक ०७३१ वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या १८ फेया होतील. ७ एप्रिल ते २ मेपर्यंत दर सोमवारी वास्को दि गामा येथून दुपारी चार वाजता सुटेल आणि मुजफ्फरपूर येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१२ विशेष ट्रेन १० एप्रिल ते ५ मे दरम्यान दर गुरुवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि वास्को दि गामा येथे शनिवारी दुपारी २.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला विभागात मनमाड, भुसावळ, खंडवा येथे थांबे असतील.
गाडी क्रमांक ०१४४० नागपूर ते पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडीच्या १४ फेल्या होतील. ही गाडी १३ एप्रिल ते २५ मे दरम्यान दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सोमवारी सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४३९ विशेष ट्रेन १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान दर शनिवारी पुणे येथून सायंकाळी ७.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे रविवारी २.४५ वाजता पोहोचेल.
प्रवाशांनो लक्ष द्या ! पुणे-नागपूर व बेलगाम-महू दरम्यान धावणार विशेष रेल्वेगाड्या, पहा वेळापत्रक
