---Advertisement---
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात गलवाडे रोड परिसरात एक गंभीर अपघात घडला असून पिकअप वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी बसला जोरदार धडक बसल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एसटी बसचे तसेच पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिरपूरकडून अमळनेरच्या दिशेने येत होते. गलवाडे रोडवरील वळणाजवळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे पिकअप थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकले. धडकेचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.









