नंदुरबार : शहरातील अमित गेस्ट हाऊस येथे सुरत येथील पंकज अमृत भोई (वय 22 ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असलेला पंकज अमृत भोई वय (22) ही व्यक्ती सुरत येथे हिरा कारखान्यात कामाला आहे. मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता नंदुरबार शहरातील अमित गेस्ट हाऊस मध्ये आधार कार्ड दाखवून रूम बुक केला आधार कार्ड वरती नंदुरबार तालुक्यातील आक्राळे येथील पत्ता आहे त्या आधार कार्डवर जन्म तारीख वर्ष 2002 असे आहे. अमित गेस्ट हाऊस चे कर्मचारी यांनी आज सकाळी रूम साफ करायला गेले असता रूम उघडत नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवली . पोलिसांनी रूम उघडून पाहिल्यावर वरील व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे.