बायकोवर संशय म्हणून नवऱ्याने बायकोच्या चप्पलमध्ये लावलं GPS ट्रॅकर; याच ट्रॅकरच्या मदतीने रंगेहात पत्नीला पकडलं….आणि मग….

---Advertisement---

 

बायकोवर संशय म्हणून एका पतीने आपल्या पत्नीच्या चप्पल मध्ये जीपीएस लावून याच जीपीएस ट्रॅक्‍टरच्या मदतीने त्याने त्याच्या पत्नीला रंगेहात पकडले आहे. या संपूर्ण अजब घटनेची चर्चा देशभरात रंगली आहे.

नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, सुखदुःखात दोघेही एकमेकांसोबत राहतील अशी अपेक्षा दोघांनाही असते. मात्र गेल्या काळाच्या काही घटना पाहिल्या तर पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला अपवित्र करणाऱ्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. काहीं घटनांमध्ये तर वाद एवढ्या टोकाला गेला, की पत्नीचा खून किंवा पतीचा खून केल्याचा देखील आपण वाचलं आहे पाहिलं आहे. एवढेच नाही तर विवाहबाह्य संबंधांच्या देखील कहाणी आपण रोज वाचत आहोत. दरम्यान, असंच काहीच एक चक्रावून टाकणारं प्रकरण हे समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पतीला त्याच्या पत्नीवर संशय होता म्हणून त्याने जीपीएसच्या मदतीने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही बिहारच्या पाटणा येथील आहे. पाटणा येथे फुलवारी शरीफ भागात एकता नगर नावाचा एक परिसर आहे आणि याच परिसरामध्ये नवऱ्याने त्याच्या बायकोला जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने रंगेहात पकडला आहे. नवऱ्याने चक्क त्याच्या बायकोच्या चप्पल मध्ये जीपीएस लावून त्या जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने ती कुठे जाते यावर लक्ष ठेवत तिला प्रियकरासोबत रंगेहात पकडला आहे.

या दोघांचं लग्न झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नवऱ्याला बायकोवर संशय होता. तिचे कुठेतरी प्रेम प्रकरण सुरू आहे. असं त्याला वाटत होतं आणि याची सत्यता त्याला पडताळून पाहायची होती. त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण सापळा रचत त्याच्या बायकोच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर लावलं आणि बाहेर कामाला निघून गेला. नवरा घरी नसल्याची संधी साधत बायको ही जीपीएस ट्रॅकर लावलेली चप्पल घालून बाहेर गेली. आणि त्या ट्रॅक्टरच्या मदतीने नवऱ्याने त्याच्या बायकोचं लाईव्ह लोकेशन हे शोधलं. आणि तो त्या ठिकाणी पोहोचला मात्र त्या ठिकाणी जे दृश्य त्याने पाहिलं त्यावेळी त्याची पायाखालची जमीनच सरकली.

जीपीएस ट्रॅकरमुळे त्याने त्याच्या पत्नीला रंगेहात पकडलं आणि ती तिच्या प्रियकरासोबत आढळून आली. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये खूप मोठे वाद निर्माण झाले. तिच्या नवऱ्याने प्रियकराजवळ असलेली पिस्तूल व सोन्याची चैन ही घेतली, त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. मात्र फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नवरा बायकोची समजूत काढल्याने दोघांनीही या प्रकरणी कुठलीही तक्रार नोंदवली नाही. म्हणून तूर्तास तरी हे प्रकरण मिटलेलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---