---Advertisement---

तर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला असता : खा. राऊत

by team

---Advertisement---

जळगाव : राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार होत आहे. अशाच एका प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन राज्यातील मोठा घोटाळा उघड केला आहे, असे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत सांगितले. घोटाळा आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार, असा प्रश्न खा. राऊत यांनी उपस्थित केला.

एका प्रकल्पातून संबंधित खात्याचा मंत्री 3 हजार कोटी रुपये मिळवतो, ही राज्याची एकप्रकारे लूट आहे. निवडणुकीपूर्वी भाजपला मेघा इंजिनीअरिंग कंपनीने इलेक्ट्रोरल बॉण्डद्वारे हजारो कोटी रुपये दिले होते. त्यांनी सर्वाधिक निधी भाजपला दिला होता. याच कंपनीने निवडणुकीपुर्वी शिंदे यांनाही शेकडो कोटी दिले होते. त्याच पैश्यांनी आमदार, खासदार आणि यंत्रणा विकत घेण्यात आली. यामुळे त्यांना निवडणुका जिंकत्या आल्या. या सर्वांची परतफेड म्हणून मेघा इंजिनीअरिंगला 14 हजार कोटींची निविदा देण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, यानंतर राज्यातील भष्टाचार न्यायालयामुळे देशासमोर आला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणात संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता.

---Advertisement---

निवडणुकीपुर्वी मेघा इंजिनीअरिंगकडून हजारो कोटी घेण्यात आले. आता त्यांना नियमांना डावलून कंत्राटे देण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अनेक नेते तुरुंगात जाण्याच्या योग्यतेचे आहेत. परंतु, त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होतांना दिसत नाही. यासोबतच देवेंद्र फडणवीस हे प्रशासनातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे म्हणाले होते. याउलट, त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत. राज्यात याआधाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेव्हा काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामे घेतले होते. परंतु, फडणवीस केवळ कारवाई करु अशी घोषणा करतात. मात्र, प्रत्यक्ष कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. धुळ्यात अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या खासगी सचिवांकडे सापडलेल्या रोकडप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या फक्त घोषणा करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---