---Advertisement---
घरी कोणी नव्हतं म्हणून प्रियसीने प्रियकराला तिच्या घरी बोलवलं. प्रियकराचं नाव होतं किरण, आणि प्रेयसीचं नाव होतं प्रेरणा. त्याला वाटलं आपल्याला एकांतात वेळ मिळेल म्हणून तो तिच्या घरी गेला. आणि आज काहीतरी वेगळं होईल, असा विचार करत असताना प्रेरणाने किरणचे डोळे बांधले. तिने त्याला खुर्चीवर बसवलं, त्याचे हातपाय बांधले. हे सर्व करत असताना किरणने तिला विचारलं की, प्रेरणा तू हे काय करतेस. त्यावेळी प्रेरणांनी किरणला सांगितलं की परदेशात जसा प्रपोज करतात तसं मी करते. आणि किरणने सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला. मात्र त्याला याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती. की प्रेरणाच्या डोक्यात काहीतरी भयानक शिजत आहे. हे संपूर्ण भयानक प्रकरण आहे दक्षिण बंगळूर मधलं.
दक्षिण बंगळूर मधल्या अंजानापुरा येथे प्रेरणा ही तिच्या आई व भावासह राहत होती. किरण आणि प्रेरणा हे दोघी टेलिकॉमच्या दुकानात नोकरी करत होते. दोघीही 27 वर्षांचे असून टेलिकॉमच्या दुकानात काम करत असताना त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. वर्षभरापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर प्रेरणाला असं वाटू लागलं की किरण हा माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, माझ्याशी तो लग्न करणार नाही, म्हणून प्रेरणा ने तिच्या घरी कोणी नसताना किरणला बोलवून घेतलं. किरण हा घरी आल्यानंतर प्रेरणा आधी त्याच्याशी काही काळ बोलली. नंतर हात रुमालाने त्याचे डोळे बांधले, त्याला खुर्चीवर बसवलं… किरण ने त्यावेळी विचारलं की तू हे काय करत आहेस, त्यावेळी प्रेरणा किरणला म्हणाली, मी तुला वेस्टर्न स्टाईल प्रपोज करते आहे. आणि डोळे बांधल्यानंतर प्रेरणाने त्याला खुर्चीवर बसवलं व त्याचे हातपाय बांधले. तिच्यावर विश्वास असल्याकारणाने किरणने तिच्यावर संशय घेतला नाही. किरणला वाटलं की ही रोमांसची नवीन पद्धत असेल. पण प्रेरणाच्या डोक्यात मात्र प्रेम नव्हतं तर बदल्याचा सूड होता. कारण किरण तिच्याकडे पूर्वीसारखा लक्ष देत नाही असं तिच्या मनात घोंगावत होतं.
डोळ्याला पट्टी बांधली, त्यानंतर हातपाय बांधल्यावर त्याला खुर्चीवर बसवलं आणि थंड डोक्याने तिने ती खुर्ची पेटवून दिली. आणि सर्वात धक्कदायक बाब म्हणजे आपला प्रियकर आपल्या डोळ्यांसमोर अशा पद्धतीने मरतोय याचं तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीला अटक करण्यात आली आहे व चौकशीनंतर तिनेच किरणला जाळून मारल्याचं स्पष्ट केला आहे. रिलेशनशिप मध्ये असताना किरण हा पूर्वीसारखा मला महत्व देत नाही. हे तिच्या डोक्यात होतं आणि यातूनच तिने हे सर्व केलं असं पोलीस उपायुक्त डी.एल. नागेश यांनी सांगितला आहे.









