---Advertisement---

सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!

---Advertisement---

---Advertisement---

अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. अभिजीत भरतसिंग राजपूत (वय २७, रा. मळाणे, वणी, ता. जि. धुळे) असे फरार आरोपीचे नाव आहे.

गुन्हा क्र. ४६०/२०२४ अंतर्गत भारतीय दंड विधान बीएनएस कलम 308(8), 3(4) नुसार १६ डिसेंबर २०२४ रोजी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव करत होती. तपासादरम्यान, अभिजीत राजपूतसह त्याचे साथीदार अक्षय उर्फ घोडा भिमराव पाटील (ता. पारोळा), संभाजी पाटील (रा. सातरणे), व अजय थोरात (रा. नवलनगर, धुळे) यांनी संगनमत करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. यातील अक्षय पाटील याला फेब्रुवारी २०२५ मध्ये अटक झाली होती, मात्र उर्वरित आरोपी फरार होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. २६ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राजपूत आपल्या मूळ गावी आला असल्याचे समजताच पथकाने सापळा रचत त्याला अटक केली.

अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अभिजीत राजपूतने अमळनेर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ५६३/२०२४ अंतर्गत आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या अभिजीत राजपूत याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील सखोल तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परीमंडळ अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग अमळनेर विनायक कोते, स्थानीक गुन्हे शाखा जळगाव वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोशि राहुल कोळो, मपोशि दर्शना पाटील, चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---