Maharashtra Assembly Election 2024: ‘हे’ ४० स्टार प्रचारक सांभाळणार भाजपच्या प्रचाराची धुरा

by team

Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा घोषित झाले असून, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये राष्ट्रीय स्तारावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य एम. सिंधिया, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंह सैनी, हिमंता बिस्वा सरमा, शिवराज सिंह चौहान, शिवप्रकाश, भूपेंद्र यादव, डॉ. प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल, विष्णू देव साई, यांचा समावेश आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे, रावसाहेब दानवे, मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील,गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, अमर साबळे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, विनोद तावडे, ॲड. आशिष शेलार, मुरलीधर मोहळ,चंद्रकांत (दादा) पाटील, अशोक नेते, डॉ. संजय कुटे यांचा समावेश आहे. याबरोबरच पंकजा मुंडे, स्मृती इराणी, नवनीत राणा या तीन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

#image_title
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment