जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात जळगाव, सामनेर, आसोदा, एरंडोल, भडगावसह अनेक गावांमधून आलेल्या आदिवासी बांधव सहभाग झाले होते.
आमच्या मागण्या मान्य झाल्यास पाहिजे, आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जळगाव तालुक्यातील असोदा येथील आदिवासी नागरीकांची शासकीय जागांवरील घरांना नियमित करण्यात यावेत. बेघरांना गट क्र. 75 मध्ये तसेच इतर शासकीय गट नंबरमध्ये घरकुलाचा लाभ तसेच दफनभुमी व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणी केली आहे.
जळगाव तालुक्यातील असोदा येथील आदिवासी नागरीकांची शासकीय जागेवरील घरांना नियमित करण्यात यावे. बेघरांना गट क्र. 75 मध्ये तसेच इतर शासनाचे गट नंबरमध्ये घरकुलाचा लाभ देण्यात यावा. यासोबतच आदिवासी बांधवाना दफनभुमी व सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी , अशी मागणी केली आहे. यासंदर्भात गावातील सरपंच , ग्रामसेवक हे हेतुपुरस्सर व सुडबुध्दीने शासनाच्या योजनेपासून आदिवासींना वंचित ठेवीत आहे. म्हसावद येथील आदिवासी जमातीचे नागरीकांना गट नं. 234 मध्ये तसेच इतर शासनाचे गट नंबरमध्ये घरकुलासाठी जागा मिळावी. गावातील सरपंच, ग्रामसेवक राजकीय पुढा-यांना हाताशी धरून आदिवासींना हेतपुरस्सर व सुडबुध्दीने शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, भावेश गायकवाड , अमृत गायकवाड, जगन वाघ, कैलास ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.