खाजगी क्लासच्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; पालकांमध्ये संताप, परिसर हादरला…..!

---Advertisement---

 

खाजगी क्लासच्या शिक्षकाकडून एका अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पालकांमध्ये वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये महाड येथे एका खाजगी क्लासच्या शिक्षकाने दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली असून आरोपी शिक्षक सुनील गांधी विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये एका खाजगी क्लासमध्ये ही घटना घडली असून या खाजगी क्लासचा मालक आणि शिक्षक आरोपी सुनील गांधी याच्यावर दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोठे गंभीर आरोप केलेले आहेत. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आरोपी शिक्षक सुनील गांधी याने विद्यार्थ्याला त्याच्या क्लासच्या वरील बाजूस असलेल्या एका बेडरूम मध्ये नेले आणि त्या ठिकाणी आरोपी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केले व त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.

याबाबत पीडित अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत हिंमत दाखवली आणि यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक सुनील गांधी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. महाड पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे व या प्रकरणाचा सखोल तपास हा पोलिसांकडून सुरू असून आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी सध्या पालकांकडून केली जात आहे.

गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरामध्ये चिंतेच वातावरण पसरलं आहे कारण महिला असो वा लहान बालक यांच्यावरील अत्याचाराच्या घटना या वारंवार घडत असतात आणि गेल्या 24 तासात ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचं कृत्य घडल्याने सध्या पालकांमध्येही भीतीच वातावरण व असुरक्षिततेची भावना ही निर्माण झालेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---