अमेरिका-इस्रायल-इराण तणावाचा परिणाम; सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार…. तज्ज्ञांचे मोठे संकेत

---Advertisement---

 

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असतो. विशेषतः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. काही काळात सोन्याचे दर ऐतिहासिक पातळीच्या जवळ पोहोचले होते.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली. त्यामुळे सोन्याचे दर झपाट्याने वाढले. मात्र या युद्धाचा परिणाम संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर डॉलर मजबूत झाल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरकडे वळण्यास सुरुवात केली. परिणामी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली.

दरम्यान, शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदारांनी यापूर्वी ईटीएफ (ETF) च्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक केली होती. मात्र अलीकडे शेअर बाजारात घसरण झाल्याने ईटीएफमधील गुंतवणूकही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पुन्हा फिजिकल सोन्याकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असल्याने सोन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत सोन्याच्या भावावर अनेक घटकांचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची ताकद आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यावर सोन्याच्या दरांची दिशा ठरणार आहे.

जर युद्धस्थिती शांत झाली आणि जागतिक पातळीवर स्थिरता निर्माण झाली, तर सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नसराईचा हंगाम आणि बाजारातील मागणी वाढल्यास सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होऊ शकते. दुसरीकडे युद्ध आणि आर्थिक अनिश्चितता कायम राहिली तर गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळू शकतात आणि त्यामुळे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा परिस्थितीत पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे मत सराफा व्यावसायिक बाफना यांनी व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---