---Advertisement---

ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

by team
---Advertisement---

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित पद्धतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी जळगावतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.


या उपक्रमांतर्गंत तब्बल 3 हजार 500 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन राज्यस्तरावर सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण ठरले आहे. या संपूर्ण मोहिमेत सर्वत्र कार्यकर्ते, नागरिक, युवक, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जिल्हानिहाय रक्तसंकलन तपशील

जामनेर तालुका – 160 बाटल्या
रेमंड टेक्सटाईल कंपनी आणि जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात पार पडले.

जळगाव शहर व परिसर – 550 बाटल्या
रेडक्रॉस ब्लड बँक, जी.एम. रक्तदाता ग्रुप आणि भाजप कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली.

धुळे जिल्हा – 110 बाटल्या
स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रभावी रक्तसंकलन.

नाशिक ग्रामीण – 170 बाटल्या
युवकांचा मोठा प्रतिसाद, विविध गावांमधून रुग्णालये व रक्तपेढ्यांच्या सहभागाने साकारलेली शिबिरे.

नाशिक शहर – 2,510 बाटल्या
या अभियानातील सर्वाधिक रक्तसंकलन. विविध औद्योगिक कंपन्या, सामाजिक संस्था आणि नाशिकमधील हजारो युवकांनी पुढाकार घेतला. हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावरही कौतुकास्पद ठरू शकतो.

या उपक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. जी.एम. फाउंडेशन, जी.एम. रक्तदाता ग्रुपचे स्वयंसेवक, सामाजिक संस्था, रक्तपेढ्या, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले. रक्तपेढ्यांनी सुरक्षिततेचे सर्व निकष पाळत अत्यंत काटेकोर नियोजनाद्वारे संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

जळगावात रुग्णांना अन्नदान, फळवाटप तसेच रक्तदान

खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या हस्ते अन्नदान व फळ वाटप करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा, जिल्हाध्यक्ष भारती सोनवणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा व मंडळ पदाधिकारी, मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला काळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी व तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थिती होती.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment