---Advertisement---
Jalgaon News : महानगरपालिका जळगाव निवडणूकची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. मतदारांची सोय लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने प्रभागनिहाय मतदान केंद्रे आणि मतदार यादी प्रसिद्ध केली असून, नागरिकांना आता आपले मतदान नेमके कोणत्या केंद्रावर आहे, हे सहजपणे शोधता येणार आहे.
मनपाने मतदारांच्या सुविधेसाठी याद्या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://jcmc.gov.in/ भेट दिल्यानंतर, तेथे महापालिका निवडणूक २०२५-२६ या पर्यायावर क्लिक केल्यास मतदान केंद्रे आणि मतदार यादी अशा दोन्ही लिंक उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, यंदा या मतदार याद्या कलर फोटोसह प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मतदारांना आपले नाव आणि केंद्र शोधणे अधिक सोपे आणि अचूक झाले आहे. ज्या नागरिकांना ऑनलाईन सुविधा वापरता येत नाही, त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या चौदाव्या मजल्यावर या याद्या प्रत्यक्ष स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तेथे जाऊनही मतदार आपले नाव तपासून केंद्राची माहिती घेऊ शकतात. मतदान केंद्रांची निश्चिती झाल्यानंतर आता प्रत्येक केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याचे काम मनपा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.









