जळगाव : IMD मुंबईने दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा तातडीचा इशारा आहे. हा इशारा पुढील ३–४ तासांसाठी असणार आहे.
पुणे, सातारा, अहमदनगर, रायगड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४०-५० किमी प्रती तास वाऱ्यासह पाऊसाचा गंभीर इशारा दिला आहे.
जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग व धाराशिव या जिल्ह्यात ३०-४० किमी प्रती तास वाऱ्यासह पाऊसाचा मध्यम इशारा देण्यात आला आहे.
सर्व नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी:
- जनावरे व प्राणी यांची सुरक्षितता:
- जनावरे झाडाखाली बांधू नयेत.
- विजेच्या धक्यापासून बचावासाठी त्यांना मेटल शेडखाली ठेवू नये, विशेषतः जे अर्थिंग शिवाय आहेत.
- त्यांच्या अन्नपाण्याची सोय करून त्यांना कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवा.
- विजांचा कडकडाट असताना सुरक्षित वागणूक:
- विजांचा धोका असताना मोबाइल वापरत चालू नका.
- दुचाकीवरून प्रवास टाळा. पावसात व वादळात अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
- जुनी व अपूर्ण इमारतींपासून दूर रहा:
- मोडकळीस आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीपासून सुरक्षित अंतर ठेवा. पडझड होण्याची शक्यता असते.