---Advertisement---

दुर्दैवी! तरुणाने गळफास घेऊन संपवलं जीवन, रिंगणगाव येथील घटना

by team
---Advertisement---

एरंडोल :  तालुक्यातील रिंगणगावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथे एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रिंगणगाव येथील योगेश शंकर हटकर (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि . १६ मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. नीलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार पो.ना. दत्तात्रय ठाकरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment