मॉन्सूनबाबत मोठी अपडेट; पुढील 10 तासांत अनेक राज्यांत जोरदार पावसाचा इशारा

---Advertisement---

 


देशातील अनेक भागांत मॉन्सूनची वाटचाल अद्याप संथगतीने आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 10 तासांसाठी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

काही ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.देशातील काही राज्यांमध्ये गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात भारतीय हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रातही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, राज्यातील अनेक भागांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उकाड्याने हैराण नागरिकांना मात्र अजून मान्सूनची प्रतीक्षा कारवी लागणार आहे.

राज्यात मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट वातावरण कायम असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनचे पूर्ण आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता असून 18 जूनपर्यंत परिस्थिती अनुकूल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मॉन्सून उशिरा दाखल होत असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---