नंदुरबार शहरात पूर्ववैमनस्यातून डोक्यात वार करून तरुणाची हत्या; उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद…!

---Advertisement---

 

नंदुरबार शहरातील मंदाकिनी हॉटेलचे मालक हे जय वळवीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये असताना हॉटेल चालू ठेवण्याची हिंमत का केली? तुझ्या हॉटेल चालू ठेवण्याच्या काय संबंध या कारणावरून सागर जाधव ह्या तरुणाला संशयित आरोपी यांनी लाकडी दांड्याने डोक्यावर हातावर तसेच कॅनर मशीन डोक्यावर फेकून मारून गंभीर दुखापत करून खून केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली या संदर्भात कुणाल सदाशिव मराठे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी कुणाल सदाशिव मराठेने फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी हॉटेलचे मालक हे जय वळवीच्या खुनाच्या गुन्हयामध्ये जेल मध्ये असतांना हॉटेल चालू ठेवण्याची हिम्मत का केली. तुझा हॉटेल चालु ठेवण्याचा काय संबंध या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कैलास पाडवी याने लाकडी दांडयाने सागर जाधव याचे पोटात, हातावर व डोक्यावर मारहाण केली तर विक्की राजपुत याने स्कॅनर मशिन डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली तसेच सर्वानी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली; असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात संशयित म्हणून विक्की राजपुत रा. परदेशीपुरा नंदुरबार, कैलास पाडवी रा.वाघोदा, नंदुरबार, दिपक ठाकरे रा. नंदुरबार, निलेश ऊर्फ बंटी वसंत चौधरी रा. चौधरी गल्ली, नंदुरबार आणि त्यांचे सोबत असलेला एक अनोळखी मुलगा यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

सविस्तर वृत्त असे की, सागर रमेश जाधव (कैकाडी) वय २५ वर्ष रा.रायसिंगपुरा नंदुरबार असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून नंदुरबार शहरातील तळोदा रोडवर हॉटेल मंदाकिनीचा व्यवस्थापक म्हणून तो काही वर्षांपासून काम पाहत होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाल सदाशिव मराठे राहणार श्रीजी कॉलनी नंदुरबार नामक तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार काल शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे मंदाकिनी हॉटेलच्या काउंटरवर सागर हा दैनंदिन काम पाहत होता. त्यावेळी काही तरुण हॉटेलमध्ये आले आणि काउंटरवर बसलेल्या सागरवर हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेला सागर हॉटेलमधून बाहेर पडला तेव्हा त्याचा मित्र कुणाल मराठे याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचार चालू असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान नंदुरबार शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी आदिवासी संघटनेत कार्यरत असलेल्या जयंत वळवी याचा सिंधी कॉलनी परिसरात चाकूने भोसकून हत्या झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण झाला होता. कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेऊन जाळपोळ करण्याचा प्रकार देखील घडला होता. त्याप्रकरणी भैय्या मराठे व अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आजची हत्या ज्या मंदाकिनी हॉटेलमध्ये झाली त्याचे मालक हेच मराठे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या हत्या प्रकरणात हल्लेखोरांनी जय वळवी हत्येचा संदर्भ दिल्याचे म्हटले जात असल्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. हॉटेल मंदाकिनी आणि शहरातील रायसिंगपूर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आ

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---