---Advertisement---

Crime News : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार

---Advertisement---


जळगाव : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एका ` तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या सोबतचा तरुण गंभीररित्या जखमी झाला. गुरुवारी (३ जुलै) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना धनाजी पेट्रोल पंपाजवळ घडली. मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८ रा. असोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मोहम्मद खाटीक हे जळगाव येथे दुकानात कपड्याचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मित्र जावेद जाकिर पटेल (वय २९, रा. भादली) असे दोघे जण आज दुचाकीने जळगाव येथे येत होते. दरम्यान भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हे दोघे मित्र रस्त्यावर फ`कले जाऊन गंभीररित्या जखमी झाले.

प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. बेशुध्दावस्थेतील मोहम्मद खाटीक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला. नातेवाईकांसह स्नेहीजनांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. अनेकांनी येथे हळहळ व्यक्त केली. मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मुलीवर अत्याचारप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

सोयगाव: फर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत टिटवी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोमवारी (३० जून) संशयित पती व पत्नीविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

---Advertisement---

टिटवी (ता. सोयगाव) येथील निवृत्ती चिखले याने आपल्याच घरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन भाचीवर नात्याचा गैरफायदा घेत २० ते २८ जूनदरम्यान शारीरिक संबंध ठेवले. ही बाब संशयिताची पत्नी सविता निवृत्ती चिखले हिला माहीत असूनही तिने ती लपवून ठेवली. वारंवार होणारे अत्याचार असह्य झाल्याने पीडित मुलीने मावशीला सांगितले व मावशी नातेवाइकांसोबत फर्दापूर पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित निवृत्ती चिखले व पत्नी सविता चिखले (रा. टिटवी, ता. सोयगाव) यांच्याविरुद्ध बाललैंगिक संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, उपनिरीक्षक श्रीमती सुडके व पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---