---Advertisement---

हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना मन्ना ; आठ जण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या आदेशावरून करण्यात आली. गुरुवारी (10 जुलै ) रोजी मध्यरात्री १२.०१ ते १ वाजेदरम्यान, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नं. २०९ मध्ये काही जण ‘तीन पत्ती’ (झन्ना मन्ना) प्रकारचा हार-जीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

---Advertisement---

या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, रूम नंबर २०९ ही मदन कुल्ला यांच्या नावावर बुक करण्यात आलेली असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात ८ जणांकडून एकूण १९ लाख ९७ हजार रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.

यांना घेतले ताब्यात

आठ हाय प्रोफाईल जुगार खेळणाऱ्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पप्पू सोहम जैन, अखिल विजय बनवट, भावेश पंजोमल मंधान , मदन सुंदरदास लुल्ला, सुनील शंकरलाल वालेचा, अमित राजकुमार वालेचा, विशाल दयानंद नाथानी, कमलेश कैलासजी सोनी असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून साधारण 7 लाख रुपये रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य मोबाईल असा एकूण 19 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकल्याने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सहा. फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. २५३/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ), ४,५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाणे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदीप चव्हाण, किशोर पाटील, रविंद्र कापडणे आदींच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---