---Advertisement---

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची बदली

by team

---Advertisement---


जळगाव : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्य प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी प्रशासकीय बदली आहे. त्यांच्या जागी परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जालना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगाल धुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. यात जिल्हात २०० हून अधिक सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासोबतच त्यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसह प्रत्येक जिल्हा परिषद शाळांना संरक्षणमंत डिजीटल शाळा, शाळा वर्ग खोल्या बांधकाम, मुख्यमंत्री माझी शाला योजनेत सहभाग, जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

परिणामी जि. प. शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा कल वाढला. जिल्ह्यातील शाळांची गुणवना वाढीसाठी उपक्रमांना प्राधान्य दिले. जिल्हाभरातील शाळांना भेटी देऊन त्यांनी विविध उपक्रमांना बळ दिले. शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून त्यांच्या बदलीबाबत आदेश पारित करण्यात आले आहेत.


जळगाव जिल्हा परिषदेत मावळते शिक्षणाधिकारी विकास पाटील यांची कारकिर्द लोकाभिमुख अशी राहिली, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे कौतूक करतांना सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment