---Advertisement---
तळोदा : शहरासह परिसरात बिबट्या पाठोपाठ आता तरसाचा मुक्त संचार झाला आहे. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण झाले असून, वन विभागाने या हिस्त्र प्राण्याचा तात्काळ बदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी शहरातील मनोज बाविस्कर यांच्या राजकुळे नगरात असलेल्या घरात भर दिवसा तरसने घुसण्याच्या प्रयत्न केला. ही बाब बाविस्कर यांच्या लक्षात येताच, त्यांनी काठी घेत तरसाला हटकवले. या घटनेमुळे राजकुळे नगरात भितीचे वातावरण निमोण झाले आहे.
दरम्यान, मगील वर्षी या भागात बिबट्याचा मुक्त संचार होता. आता भर दिवसा तरसाच्या मुक्त संचार झाल्याने नागरीकांना भिती निर्माण झाली आहे. परिसरात हिस्त्र प्राण्याच्या मुक्त संचार सुरु असल्याने वन विभागाने घटनेची दखल घेवून त्वरीत कार्यवाही करून या हिस्त्र प्राण्याचा बंदोस्त करावा, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे
मोबाईलमध्ये कैद
दि.१९ रोजी रात्री राजकुळे नगर पाठीमागे दक्षिणेला तीन किलो मीटर व गुजराथ राज्यातील बहरूपा येथे रात्री तहस संचार करित असल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरली, या तरसाला पाहाण्यासाठी नागरीकांनी काठ्या, टॉर्च घेवून एकच गर्दी केली. काहीनी ते चित्र मोबाईलमध्ये कैद केले असून, सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.