---Advertisement---

उधारी मागणे बेतले जीवावर, अल्पवयीन मुलाने दुकानदार महिलेचा केला खून

---Advertisement---

चंद्रपूर : उधारीवर सिगरेट देण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकिणीचा राग आल्याने एका अल्पवयीन मुलाने तिची हत्या केल्याची घटना रविवारी (१५ जून ) रोजी उघड झाली आहे. जिल्ह्यातील राजुरा शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रमाबाई नगर परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुकानदार महिलेचा खून केला. मुलाने महिलेकडे उधार सिगारेटची मागणी केली असता महिलेने ती देण्यास नकार दिला. याचा राग येऊन मुलाने महिलेचा १५ जून रोजी खून केला. मरण पावलेल्या महिलेचे नाव कविता रायपुरे असे आहे. राजुरा पोलिसांनी पाच दिवसानंतर अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, कविता रायपुरे यांचे राजुरा येथील रमाबाई नगर परिसरात वास्तव्य होते. त्या घरांत एकट्याच राहत होत्या. त्या आपला उदरनिर्वाहासाठी घरात एक छोटेखानी किरणा दुकान चालवीत होत्या. खून करणारा अल्पवयीन मुलगा कविता यांच्या गल्लीतच राहत होता. तो नेहमी त्यांच्याकडून उधारीवर सिगारेट घेऊन जात होता. त्याच्याकडे कविता यांची जवळपास एक हजारांची उधारी होती. रविवारी (१५ जून) रोजी या मुलाने कविता यांच्याकडे पुन्हा उधारीवर सिगारेट मागितली.

---Advertisement---

कविता यांनी त्याला मागील उधारी देण्याबाबत सांगितले. तसेच तो जोपर्यंत मागील उधारी चुकती करीत नाही तोपर्यंत उधार सिगरेट देण्यास नकार दिला. यागोष्टीचा त्याला राग आला. रागातच तो त्याच्या घरी गेला. थोड्या वेळाने तो आपल्या घरुन कोयता घेऊन आला. दुकानांवर बसलेल्या कविता यांच्यावर कोयत्याने सपासप वारे केलेत. या हल्ल्यात कविता यांना मोठ्या प्रमाणांत मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

राजुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले; त्यांनी मृतदेहाल शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात गुन्ह्याची नोंद करुन घेतली.. घटनेच्या पाच दिवसांनंतर मोबाईलच्या लोकेशनला ट्रॅक करीत पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधार गृहात रवाना करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---