---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान, गुरुवारी (२६ जून ) रोजी मृत्यू ओढवला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एका शेतकऱ्याने बुधवारी (२५ जून ) रोजी नैराश्यातून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी (२६ जून ) रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. रमेश मुरलीधर कोळी (वय ५६, रा. डोलारखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
---Advertisement---
रमेश कोळी हे डोलारखेडा येथे वास्त्यव्याला होते. ते शेतीकाम करुन कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. दरम्यान, बुधवारी ( २५ जून ) रोजी घराजवळ असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास रमेश कोळी यांनी पेट्रोल अंगावर टाकून स्वतःला जाळून घेतले. कुटुंबियांना ही घटना समजताच त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना २४ तासात रमेश कोळी यांचा उपचारादरम्यान गुरुवारी ( २६ जून ) रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले असा परिवार आहे. त्यांनी नैराश्यातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली असून डोलारखेडा येथे शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.