---Advertisement---

Crime News : हॉटेलमध्ये गेलेल्या वृद्धाची चोरट्याने लांबविली बॅग

---Advertisement---

Crime News जळगाव : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करीत लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे विविध क्लुप्त्यांचा वापर करुन जेष्ठ नागरिकांना टार्गेट करीत आहेत. अशीच एक घटना भडगाव येथील बसस्थानक परिसरात घडली आहे. भडगाव बस स्थानकाजवळील हॉटेलमध्ये एका वृद्ध व्यक्तीची १ लाख रुपयांचे बंडल असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविण्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना शुक्रवारी (२७ जून) रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

शुक्रवारी (२७ जून ) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भगवान पाटील हे स्वतः जवळील अंगठी व सोने बँकेत तारण ठेवले. यानंतर बँकेमधून काढलेले १ लाख रुपये त्यांनी त्यांच्याजवळील लाल कापडी पिशवीमध्ये ठेवले. ते बँकेतून बाहेर पडले. यानंतर ते पाणी पिण्यासाठी बस स्थानकाच्या शेजारील भोईराज हॉटेलमध्ये गेले.

त्यांनी त्याच्या हातातील पैशांची बॅग ही हॉटेलमधील मुरमुऱ्यांच्या पोत्यावर ठेवली. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांची नजर चुकवून ही पैशांची बॅग लंपास केली. भगवान धर्मसिंह पाटील (वय ५१, रा. नाचनखेडा) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी (दि. २७ जून) रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---