---Advertisement---
विक्की जाधव
अमळनेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र , वाहनाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार शिरीष चौधरी हे सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान दादा यांचे दर्शन घेऊन परतत होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला बडोदा परिसरातील वडाला चौफुलीजवळ अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात गाडीत प्रवास करणारे सर्वजण सुखरूप असून, काहींना किरकोळ जखमा व फॅक्चर झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिरीष चौधरी यांची प्रकृती स्थिर असून, घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.मात्र , गाडीचे नुकसान झाले आहे.