---Advertisement---

जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, शहर उपमहानगराध्यक्षपदी राजेंद्र निकम आणि प्रकाश जोशी

---Advertisement---

जळगाव : आगामी स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील सक्रिय झाला आहे. मनसेने त्यांच्या पदाधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मनसे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

---Advertisement---

यात जळगाव शहर उपमहानगराध्यक्षपदी राजेंद्र निकम, प्रकाश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर प्रसिद्धी प्रमुखपदी सतीश सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते सैंदाणे यांनी आपल्या नवीन पदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली.

नियुक्ती करतेवेळी महानगराध्यक्ष किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, महिला सेना अनिता कापुरे, लक्ष्मी भील, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---