---Advertisement---

आव्हाणे येथे अटल जनकल्याण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

---Advertisement---

जळगाव : आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे माजी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी यांनी आयोजित केलेल्या अटल जनकल्याण शिबिरास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ॲड. चौधरी यांनी राबविल्याचा उल्लेख भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला. ते प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

---Advertisement---

या शिबिरामुळे पंचक्रोशीतील हजारो माता-भगिनींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. शिबिरात कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, आज जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती देखील होती. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या शिबिराला गोपाल भंगाळे, राजेंद्र सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, शालिक पाटील, सुदाम राजपूत, दिनकर चौधरी, साहेबराव पाटील, धर्मराज सोनवणे, गोरख सोनवणे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. हर्षल चौधरी यांचा हा प्रयत्न समाजातील गरजूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---